१० वर्षे... शोध नव्या दिशांचा...

सस्नेह नमस्कार,


दशकपूर्तीच्या आजवरच्या प्रवासात आपण जी साथ दिलीत त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद...

आपलं प्रत्येक स्वप्न साकारण्यासाठी आवश्यक माहिती आणि त्यासाठीच्या प्रेरणादायी यशोगाथा सातत्यानं देण्याचं काम ‘अमृतवेल मीडिया’ने २००९ पासून आजअखेर म्हणजे गेली दहा वर्षे अखंड चालू ठेवलं आहे.

सुरुवात केली आर्थिक साक्षरतेला वाहिलेल्या ‘मनी प्लस’ अंकापासून. त्यानंतर नोकरीच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या उद्योग-व्यवसायाचे विश्‍व उभारण्याची प्रेरणा आणि दिशा देणारा ‘अमृतवेल बिझनेस’ हा अंक सुरू केला. या दोन्ही अंकांनी आपली उपयुक्तता सिद्ध केल्यानंतर प्रशासकीय प्रेरणा आणि कल्पनांचे आदानप्रदान करणार्‍या ‘अमृतवेल गव्हर्नन्स’ अंकाचे पर्व सुरू झाले. प्रशासनातील नावीन्यपूर्ण काम लोकांसमोर ठेवून त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यात हा अंक यशस्वी झाला. लोक वाचतात का? असा प्रश्‍न विचारला जात असल्याच्या काळात या अंकांना मराठी वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याच बळावर पुढील वाटचाल सुरू आहे.

हे अंक आपण यापुढेही नियमित वाचावेत, संग्रही ठेवावेत. काळानुरूप उपयुक्त माहिती समजून घ्यावी. तिचा अंमल करावा. नव्या जगाबरोबर वाटचाल करावी, याबरोबरच हा ठेवा नव्या पिढीकडेही द्यावा, ही विनंती...


आपला

धर्मेंद्र पवार
व्यवस्थापकीय संपादक,
अमृतवेल मीडिया प्रा. लि.

View Details