नियोजनशून्य कारभार, भ्रष्ट प्रवृत्तीमुळे महापूर

याचिकाकर्ते डाॅ. अमोल पवार यांचा आरोप

धर्मेंद्र पवार, अमृतवेल मीडिया:19-Jun-2020


गेल्या 13 ते 14 वर्षात संबंधित अधिकारी व नेत्यांनी पुराच्या नियोजनशून्य कारभाराने व स्वार्थी, भ्रष्टाचारी प्रवुतीमुळे पुरपट्ट्यात अतिक्रमण करण्यासाठी मुभा दिल्यानेच सर्वसामान्य लोकांचा आता जीव जात आहे. राजकीय आश्रित वाळू माफियांच्या सहयाने बेकायदेशीर वाळू उपसा हेही खूप महत्वाचे कारण आहे, असा आरोप महापूरसंबंधी सर्वोच्च न्यायालयातील जनहित याचिकाकर्ते डाॅ. अमोल पवार यांनी ʹअमृतवेल मीडियाʹशी बोलताना केले.

पावसाळ्यात नदीतून वाहून जाणारे शेकडो टीएमसी पाणी आपण टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेच्या साहयाने जेवढे होईल तेवढे पाणी उपसून ते दुष्काळी पट्ट्यात देणे आवश्यक आहे. हा विधायक पर्यायसुद्धा अजूनही या स्वार्थी राजकारण्यांनी अमलात आणला नाही. टँकर माफियांना फायदा पोहचविण्यासाठी काही भ्रष्टाचारी अधिकारी व नेते अजूनही टोकाचा स्वार्थपणा करीत आहेत, असेही पवार यांनी म्हटले.

सविस्तर लेख वाचा