ʹसीरमʹ बनवणार १० करोड कोरोना लसी

एका लसीची किंमत 225 रुपये असेल.

:08-Aug-2020


नवी दिल्ली- कोरोनाने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. कोरोनाने केवळ आरोग्याचा प्रश्न निर्माण केला नसून संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अर्थव्यवस्था संकटात आहे. सर्वांच्याच नजरा कोरोनावर कधी लस येतेय आणि ती सामांन्यांच्या आवाक्यात असेल का? याकडे लागल्या आहेत. याविषयी आता दिलासा मिळाला आहे.

भारत आणि अन्य अविकसित आणि विकसनशील देशांसाठी कोविड-19 वैक्सीन लसीचे १० करोड डोस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) शुक्रवारी गावी आणि बिल एंड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनशी करार केला आहे.

सीरम इन्स्टिट्यूटने यासंदर्भात म्हटले आहे की, "हा सहयोग सीरम संस्थेची उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत करेल. जागतिक आरोग्य संस्थेकडून लस मान्यता मिळाल्यानंतर गावी कोवैक्स एएमसी अंतर्गत, २०२१ च्या पहिल्या सहामाहीत, भारत आणि इतर देशांमध्ये वितरणासाठी पुरेसे डोस तयार केले जाऊ शकतात. ʹʹ

एका लसीची किंमत 225 रुपये असेल.
कंपनीने म्हटले आहे की प्रति डोस तीन डॉलर म्हणजेच सुमारे २२5 रुपये असा परवडणारा दर निश्चित केला आहे. हा वित्तपुरवठा अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि नोव्हाव्हॅक्ससाठी संभाव्य लस तयार करण्यास देखील मदत करेल. या दोन कंपन्यांच्या लसींवर सध्या चाचण्या सुरू आहेत.

बिल एंड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन, गावीला आपल्या गुंतवणूकीच्या माध्यमातून १५ करोड डॉलर्सचा निधी उपलब्ध करुन देईल. हा निधी संभाव्य लसीच्या पुनर्निर्माणासाठी सीरम संस्थेला मदत करेल आणि कमी व मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांसाठी लस खरेदी करण्यासाठी वापरला जाईल.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आदर्श पूनावाला म्हणाले, कोविड-19 विरूद्धचा आपला लढा मजबूत करण्याच्या प्रयत्नात सीरम संस्थेने भारत आणि निम्न व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी कोविड-19 वॅक्सीनचे 10 कोटी डोस तयार करण्यासाठी गावि आणि बिल एंड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनबरोबर युती केली आहे. ʹʹ

भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सेक्रेटरी रेणु स्वरूप म्हणाल्या, “कोविड-19 द्वारा सुरु असलेल्या जागतिक आरोग्य संकटाला उत्तर देण्यासाठीची सीरम संस्थेची ही जागतिक भागीदारी पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे.” ते म्हणाले की, भारताजवळ फक्त भारतासाठीच नाही तर जगासाठीदेखील प्रभावी आणि परवडणारी लस तयार करण्याचे रेकॉर्ड आहे.