पारिजातक ʹफुल्लʹला!

पारिजातकाचे झाडंच आता मिळेना!!

:09-Aug-2020


मुंबई : कुणाचे दिवस कधी पालटतील आणि प्रचंड मागणी वाढेल हे सांगता येत नाही. पारिजातकाच्या झाडाचंही तसंच झालं आहे. पारिजातक अतिशय जोरात फुलला आहे. आता हे झाड मिळेना झाले आहे. झाडाची विक्री करणाऱ्यांची अक्षरशः दिवाळी झाली आहे.

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाले. भूमिपूजनाआधी परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारिजातकाचे (Parijat) झाड लावण्यात आले. पारिजातकाचे झाड तसे पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीशी जोडले गेले आहे. मात्र महानगरांमध्ये अचानक या झाडाबद्दल नव्याने शोध सुरू झाला. आणि जेव्हा पारिजातकाचे महत्त्व त्यांना कळाले तेव्हा हे झाड लावण्यासाठी एक झुंबड उडाली.

पारिजातकाचे झाड वास्तूच्या दृष्टीने शुभ मानले जाते. या झाडेची पाने, फूल, मूळ आदींचे औषधी गुण आहेत. त्यामुळे महानगरातील लोकांनी नर्सरीमधून या झाडाची जोरदार खरेदी सुरू केली. परिणामतः पारिजातकाचा स्टॉक नर्सरीमधून संपला. इतकेच नव्हे तर २० ते २५ रुपयांना मिळणारे पारिजातकाच्या झाडाची किमत २५० रुयपांवर गेली. पारिजातकाला आश्विन-कार्तिकमध्ये फुले येतात. त्यानंतरच नवे झाड तयार होईल असे एका नर्सरी मालकाने सांगितले.

ऐतिहासिक महत्त्व

असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी जी काही रत्न मिळाली होती त्यात पारिजातकाचा समावेश होता. तेव्हा पारिजातकाचे झाड इंद्र देवाने स्वत:कडे ठेवले होते. नंतर श्रीकृष्णाने हे झाड स्वर्गातून पृथ्वीवर आणले.

पारिजातकाचे जे फूल स्वत:हून जमीनीवर पडतात फक्त त्याचा वापर पुजेसाठी गेला जातो. या झाडाचे फूल ज्यांच्या अंगणात पडतात तेथे नेहमी शांती आणि समृद्धी असते. आयुर्वेदात या झाडाबद्दल उत्तम औषधी गुण असा उल्लेख आढळतो. पचनासाठी, पोटाचे आजार, ताप लिव्हर संदर्भातील आजार आदी साठी हे झाड गुणकारी मानले जाते. पारिजातकाची पाने मधुमेह आजारावरील उत्तम औषध मानले जाते.