लोकहिताला प्राधान्य देत सहकारी संस्थांवर अंकुश

धर्मेंद्र पवार:17-Aug-2020


सहकारी संस्थांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करून त्यातील दोष दाखवून देतानाच शेतकरी व सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन संस्थेच्या प्रगतीसाठीही काम करण्याची तळमळ सांगलीचे जिल्हा विशेष लेखापरिक्षक (वर्ग १) किरणसिंह पाटील यांच्या कार्यशैलीतून दिसून येते. लेखापरिक्षणाच्या चाकोरीबद्ध असलेल्या कामामध्येही प्रवाहीपणा आणि विकासात्मक दृष्टीकोन त्यांनी निर्माण केला. यातून लोकांना, लोकहिताला व शासनाच्या उद्देशाला साध्य करण्यासाठी चोख आणि प्रामाणिकपणे कार्यरत राहण्याला प्राधान्य देणार्‍या या कर्तव्यनिष्ठ अधिकार्‍याच्या वाटचालीचा हा आढावा...

सर्वसामान्य लोक आणि शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणले गेले. या माध्यमातून गावोगावी उभारल्या गेलेल्या संस्थांचा सामान्यांना व शेतकर्‍यांना आजही चांगला फायदा होतोे. मात्र, काही चुकीच्या मंडळींमुळे अशा संस्थांमध्ये गैरप्रकारही मोठ्या प्रमाणात घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. या संस्थांच्या कामकाजावर अंकुश ठेवण्याचे काम शासनाचा लेखापरिक्षण विभाग करतो. सहकारातील साखर कारखाने, बँका, विकास सोसायट्या, सूतगिरण्या, दूग्ध अशा विविध संस्थांमधील आर्थिक व्यवहारांचे लेखा परिक्षण करण्याचे काम हा विभाग अतिशय जबाबदारीने करत असतो. त्यातूनच अनेक गैरप्रकार उजेडात आले आहेत. किरणसिंह पाटील यांनीही आपल्या सेवाकाळात ‘चुकीच्या कामांना माफी नाही’ या न्यायाने दखलपात्र कामगिरी नोंदविली आहे. त्यांनी अनेक संस्थांवर गुन्हे दाखल करतानाच कामाच्या चौकटीबाहेर जाऊन संस्थेचा फायदा कसा होईल यावरही कटाक्षाने भर दिला.

कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे हे किरणसिंह पाटील यांचे मूळ गाव. कौटुंबिक पार्श्‍वभूमी शेतीची असल्यामुळे त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून प्रशासकीय सेवेत दाखल होत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. वडील शेती पहायचे, तर चुलते (काका) शिक्षक होते. आई-वडील आणि चुलत्यांच्या संस्कार, मार्गदर्शनातून ते घडत गेले. गावात एसटीचीही सोय नसल्यामुळे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वारणानगर येथील कॉलेजला सायकलवरून जात त्यांनी फिजिक्स विषयातून पदवी संपादन केली. घरातून शिक्षणाला बळ मिळत गेले आणि चारही भावडांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांच्या मोठ्या बहिणीनेही एमएस्सी करून पीएचडी व एमबीए करुन त्या प्राध्यापिका आहेत. मोठ्या भावाने एमए बीएड पूर्ण केले व लहान बहिणीने बीएस्सी बीएड केले आहे.

सविस्तर लेख वाचा ʹअमृतवेल गव्हर्नन्सʹ अंकात...