कोरोना व्हायरस नवी लक्षणं कोणती? कोव्हिड-19 पासून संरक्षण कसं करायचं?

:13-Jun-2020


जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसची 13 विविध लक्षणं आतापर्यंत समोर आली आहे. यातली चिंताजनक गोष्ट म्हणजे 13 मधली काही लक्षणं नव्याने समोर आली आहेत. या नव्या लक्षणांबद्दल WHO ने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. सध्या जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 71 लाख 21 हजार 126 च्या पुढे गेली आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार कोरोना संक्रमणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा आता 4 लाख 6 हजार 570 वर पोहोचला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे अमेरिकेत आहेत. अमेरिकेत 19 लाख 61 हजार 185 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर मृतांचा आकडा 1 लाखांच्यावर गेला आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 67 हजार इतकी झाली आहे, तर 7 हजार 473 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढतच असल्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशातल्या कंटेनमेंट झोनमध्ये येत्या 30 जूनपर्यंत लॉकडाऊन - 5 घोषित केलंय. तर, 8 जूनपासून देशात महाराष्ट्र वगळता इतर ठिकाणी लॉकडाऊनचे नियम मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत.