महाराष्ट्र लॉकडाऊन : गावी जायला ई - पास कसा मिळवायचा?

:13-Jun-2020


कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाऊन - 5 सुरू असून यातल्या काही नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. त्यानुसार, राज्यात किंवा राज्याबाहेर प्रवास करू इच्छिणाऱ्यांना आता प्रवासासाठी ई-पास मागणी केल्यानंतर पोलिसांकडून दिला जाणार आहे. राज्यांत लॉकडाऊन - 5 म्हणजेच राज्य सरकारच्या नव्या व्याख्येनुसार ʹमिशन बिगीन अगेनʹला सुरुवात झाली आहे. यामुळे आता लॉकडाऊनच्या काही नियमांमध्ये सवलत देण्यात आली आहे. प्रवासासाठी ई-पास लागणार देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अनेकांना आहे त्या जागीच अडकून राहावं लागलं होतं. पण, लॉकडाऊनचे प्रवासाबाबतचे काही नियम शिथिल झाल्याने लोकांना ई-पास मिळवून आपापल्या गावी किंवा महाराष्ट्राबाहेर जाता येणार आहे. Image copyrightTWITTER / RAILMININDIA परराज्यातील नागरिकांना त्यांच्या घरी परतण्यासाठी जशी विशेष ट्रेन्सची सोय केली आहे तशीच राज्यातील लोकांसाठीही करण्यात आली आहे. काहीजण कामानिमित्त, शिक्षणासाठी, पाहुण्यांकडे गेले असताना किंवा पर्यटनासाठी गेल्यावर अडकून पडले आहेत. अशा लोकांना घरी जाण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी नियमावली तयार केली आहे. त्यांनी दिलेल्या प्रक्रियेनुसार http://covid19.mhpolice.in वर E-Pass साठी अर्ज करता येतो.