अजय फोटो ते अजय मोबाईल्स

:13-Jun-2020


अजय पाटील रेणावीतील समविचारी मित्रांपैकी अग्रणी. एक सक्रिय व्यक्तीमत्त्व. व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे... समाजकारण, राजकारणाची मनापासून आवड जोपासत सोशल मीडियातही आक्रमकपणे सक्रिय असणारे...
यातील सर्वात भावणारा गुण म्हणजे त्याचे व्यावसायीक कौशल्य. एक फोटोग्राफर म्हणून प्रवास सुरू करून फोटोग्राफी मटेरियल्स व्यवसायातील अग्रगण्य असा बहुमान अजयनी प्राप्त केला.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर शहरातील व्यवसायीकांशी टक्कर देत विट्यासारख्या तालुकास्तरीय ठिकाणाहून ʹअजय फोटोʹ ने आपला स्वतंत्र ठसा उमटवत, व्यवसाय विस्तार केला. फोटोग्राफी मटेरियल्स म्हणजे अजय फोटो असे समीकरण बनवले.
कोरोनाने मात्र छोट्या-मोठ्या व्यवसायांत उलथापालथ केली आहे. गेली दोन-अडीच महिने लग्नांबरोबरच सार्वजनिक कार्यक्रम ठप्प आहे. पर्यायाने फोटोग्राफी व्यवसाय थांबला आहे पण अजय थांबला नाही, लाॅकडाऊनच्या काळात त्याने काळाची पावले ओळखली. एकाच क्षेत्रावर अवलंबून न राहता साधर्म्य असलेल्या नव्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. अजय फोटो बरोबरच ʹअजय मोबाईल्सʹ हे नवे दालन सुरू केले आहे.
अजयची कार्यशैली, लोकसंपर्क आणि ग्राहकाभिमुख व तत्पर सेवा लक्षात घेता ʹअजय मोबाईल्सʹ चा विस्तारही अजय फोटोच्या पावलावर पाऊल ठेवून होणार यात शंका नाही...
ʹअजय मोबाईल्सʹ या दालनास भेट देवून खरेदी केली तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपणही या सेवेचा लाभ घ्यावा, ही विनंती...